फटाक्यांच्या स्फोटामध्ये दोन मुलांसह चौघांचा मृत्यू   

तामिळनाडूत  दुर्घटना

सालेम : तामिळनाडूत एका फटक्यांचा स्फोट झाला. त्यात दोन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून फटाके पोत्यातून वाहून नेले जात होते. एकाने ते उडतात की नाही ? याची चाचणी घेतली तेव्हा भीषण स्फोट झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. सालेम जिल्ह्यातील कांजनाईकेनपट्टी गावात एका मंदिराजवळ फटाक्यांचा स्फोट झाला. दरम्यान, द्रौपदी अम्मन मंदिरात उत्सवासाठी शोभेचे फटाके दुचाकीवरुन एका पोत्यात घालून नेले जात होते. शुक्रवारी रात्री कांजनाईकेनपट्टी गावातील पोसारीपट्टी बसस्थानकाजळ अचानक फटक्यांना आग लागली आणि त्यांचा स्फोट झाला. पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, एकाने फटाके उडतात का ? याची चाचणी घेण्यासाठीं ते पेटविले आणि त्यांचा भीषण स्फोट झाला. मंदिरापासून सुमारे एक किलोमीटरवर दुर्घटना घडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण मंदिरात उत्सवासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मृत आणि जखमींची नावे समजली असून ते ११ ते २९ वयोगटातील आहेत .मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दु:ख व्यक्त करुन शनिवारी मृतांच्या नातेवाईकांना ३ लाख रपयांची मदत जाहीर केली. 

Related Articles